वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत २ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या सायकल रॅलील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

 वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली असून त्या अनुषंगाने दि.२६ जुलै ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत नगरपरिषदेतर्फे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून  गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरात सायकल रॅली आयोजित केली. याच रॅलीचा शुभारंभ नगरपरिषद कार्यालयाकडून स्वच्छता दूत सुनिल नांदोस्कर यांच्या हस्ते रॅलील झेंडा दाखवून करण्यात आला. न.प.कार्यालयहॉस्पिटल नाकाकॅम्पराऊळवाडाशिरोडा नाकाजुना स्टॅण्डदाभोली नाकाबाजारपेठमार्गे पुन्हा न.प.कार्यालय अशी ही सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरपमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेनगरसेवक प्रशांत आपटेकृतिका कुबलस्नेहल खोबरेकरशितल आंगचेकरपूनम जाधवप्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे प्रशासकीय कर्मचारीस्वच्छ ता कर्मचारीशाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सायकल क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu