स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मंगेश मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर सर्वोत्तम स्वच्छ हॉटेलशाळारुग्णालयरहिवासी संकुल स्पर्धेतील विजेत्यांसह कच-यापासून कलाकृती प्रदर्शनात सहभागींना गौरविण्यात आले.

      इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मेस्त्री यांनी प्रथमअजय खानोलकर यांनी द्वितीय तर शिरसाठ बंधू यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सर्वोत्तम स्वच्छ हॉटेलसाठी हॉटेल मायबोलीसर्वोत्तम स्वच्छ रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्लासर्वोत्तम स्वच्छ शाळा म्हणून वेंगुर्ला हायस्कूल आणि सर्वोत्तम स्वच्छ रहिवासी संकुल म्हणून आनंदी अर्पितभटवाडी यांना गौरविण्यात आले.

      दि. १ व २ ऑक्टोबर रोजी कच-यापासून कलाकृतीटाकाऊपासून टिकाऊ आणि कच-यापासून इंधन निर्मिती यावर प्रदर्शन आयोजित केले हते. या प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या पंकज घोगळेरागिणी मोर्येसंदेश राऊळसुधीर गावडेहर्ष पिळणकरसुरेखा शिदेऋषिकेष जाधवबॅरी लुद्रिकगौरव आजगांवकरश्रुती मेस्त्रीजानवी पालवसोहम सूर्यवंशीकेतकी आपटेचिन्मय मराठे व श्रुती वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व स्पर्धांसाठी व प्रदर्शनासाठी स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर व प्रा.वसंतराव पाटोळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. याच कार्यक्रमात कु. चिन्मय मराठे याने स्वच्छतेतून समृद्धी हा जनजागृतीपर उद्बोधक संवाद साधला.

      यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरपस्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्करमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेवैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळेवेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन. सावंतनगरसेवक प्रशांत आपटे व शितल आंगचेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu