स्वच्छतेत योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सत्कार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणा-या शहरातील नागरिकांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

      यामध्ये दैनंदिन कचरा संकलित करुन त्यापासून आपल्याच परिसरात खतनिर्मिती करणारे आनंदी आर्केड फेज-२सुंदर भाटले आणि बायोगॅस निर्मिती करणारे रेडकर बंधू खानावळदैनंदिन ओला कचरा संकलित करुन आपल्याच परिसरात गांडुळ खत निर्मिती करणारे प्रादेशिक फळ संशोधन केंद्रमांडवी खाडीतील कांदळवन स्वच्छता व संवर्धन मोहिमा करुन तो परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास हातभार लावणारा स्वामिनी महिला बचत गटस्वच्छता व पर्यावरण संवर्धन अंतर्गत पथनाट्य सादर करुन जनजागृती करणारा सखी महिला बचत गट व आपला कचरा नेहमी वर्गीकरण करुन देणारे रेश्मा वरसकरराजश्री गायकवाडकृपा बर्वेअमित आरावंदेकरसुप्रिया कोरगांवकरविष्णू नाईकगणपत परब या नागरिकांचा समावेश आहे.

      यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरपस्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्करमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेवैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळेवेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी.एन. सावंतनगरसेवक प्रशांत आपटे व शितल आंगचेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu