योगेश पालव यांचा इको फ्रेंडली आकाशंकदील प्रथम

वेंगुर्ला भाजपाच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेत वडखोल येथील योगेश नंदकिशोर पालव यांच्या आकाशकंदीलाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

      भाजपाने यावर्षी दिपज्योति नमोस्तुते‘ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ४ नोव्हेंबर रोजी येथील रामेश्वर मंदिरात इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रमोद सदाशिव गावडे (अणसूर)तृतीय क्रमांक राजाराम सदाशिव लोणे (दाभोसवाडा) तर उत्तेजनार्थ मयुरेश सुरेश जाधव (आनंदवाडी) व यशोदा सुदेश वेंगुर्लेकर (गाडीअड्डा) यांना देण्यात आला. स्पर्धेचे परिक्षण जे.जे.आर्ट स्कूलचे निवृत्त प्रा.सुनील नांदोस्कर यांनी केले.  यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाणनगराध्यक्ष दिलीप गिरपउपनगराध्यक्ष शितल आंगचेकरजिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरनगरसेवक श्रेया मयेकर,  जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेलतालुका सरचिटणीस बाबली वायंगणकरतालुका सदस्य रविद्र शिरसाटओबीसी सेलचे शरद मेस्त्रीयुवा मोर्चाचे प्रणव वायंगणकरमहिला मोर्चाच्या रसिका मठकरबुथप्रमुख शेखर काणेकरओंकार चव्हाण नितीश कुडतरकरछोटू कुबलसंजय पाटीलपत्रकार महेंद्र मातोंडकररामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रविद्र परब आदी उपस्थित होते. विजेत्यांना अनुक्रमे २०००१५००१००० व ५०० अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Close Menu