‘आनंदाचे डोही‘ चे प्रकाशन

सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आत्माराम दिगंबर बागलकर यांच्या आनंदाचे डोहीया आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन ५ नोव्हेंबर रोजी  शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयात संपन्न झाले. यावेळी कोकण प्रांतचे सह प्रांत संघचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर, राज्य स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संघटक शरद खाडीलकर, पत्रकार शेखर सामंत, खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे चंद्रकांत ओटवणेकर, संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ.प्रविणकुमार ठाकरे, लवू म्हाडेश्वर, दिगंबर बागलकर, उमेश सुकी आदी उपस्थित होते.विरोध पचवून सत्य जगासमोर आणतो हे जोखमीचे काम आहे आणि ते बागलकर सरांनी केले असल्याचे उद्गार चांदेकर यांनी काढले.

Leave a Reply

Close Menu