वृंदा कांबळी यांची ‘कुरवंडी‘ कादंबरी प्रकाशित

      सुप्रसिद्ध साहित्यिका वृंदा कांबळी यांची कुरवंडीही कादंबरी कणकवलीच्या विघ्नेश पुस्तक भांडारने नुकतीच प्रकाशित करुन वाचकांसाठी ती उपलब्ध केली आहे. या कादंबरीत वेगाने बदलणा-या ग्रामीण जीवनाचा चेहरा दाखवत असतानाच संपूर्ण ग्रामीण लोकजीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. वेगवान परिवर्तनाच्या गतीतून भोवंडून जात असताना प्रलोभनांचा मोह आवरता आला नाही तर जीवन कसे उध्वस्त होऊ शकते, प्रलोभनांच्या आहारी जाऊन शोषणाचे बळी व्हावे लागते. हे आशयसूत्र असलेली कादंबरी शोषणाच्या विविध रुपांचेही दर्शन घडवते. नायिकेच्या जीवन प्रवासाचा पट उलगडत असतानाच मानवी मनाचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत.

    सौ. कांबळी यांचे यापूर्वी नाते मातीचे, रंग नभाचे, भरलेले आभाळ व अंतर्नाद असे चार कथासंग्रह, अतक्र्य, मागे वळून पाहाता, प्रतिबिंब, प्राक्तनरंग या चार कादंब-या व वळणवेड्या वाटा, वाटेवरच्या सावल्या हे दोन ललित लेख संग्रह अशी दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

 

Leave a Reply

Close Menu