सुमारे तीन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या वेंगुर्ला पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन 16 नोव्हेंबर रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, जि.प.अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, जि.प.सदस्य राजेंद्र मुळीक, सभापती अनुश्री कांबळी, उपसभापती सिद्धेश परब, पं.स.सदस्य सुनील मोरजकर, मंगेश कामत, साक्षी कुबल, गौरवी मडवळ, स्मिता दामले, गटविकास अधिकारी उमा पाटील, सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ उपस्थित होते.

      वेंगुर्ला तालुक्याला एक वेगळा असा वारसा आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांसाठी विकासकामे करण्याची परंपरा मी या मतदार संघात  जोपासली आहे. तशी परंपरा तुम्ही सर्वांनी जोपासा. पंचायत समितीच्या नूतन इमारतीत येणा-या सर्व जनतेचे समाधान होईल, असे काम करा. सभापती कांबळी यांनी पंचायत समिती इमारतीसाठी कंपाऊंडची मागणी केली आहे, तिही पूर्ण केली जाईल असे असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले.

      एखाद्या मतदारसंघाचा विकास मंत्रीपद मिळाल्यानंतर कसा करायचा हे आम्ही आमदार केसरकर यांच्याकडून शिकलो. भविष्यातही या पंचायत समितीला निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

      या नूतन इमारतीसाच्या बांधकामासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी सभापती जयप्रकाश चमणकर, दीपक नाईक, सुखदा पालयेकर, सुचिता वजराटकर, अभिषेक चमणकर, नीलेश सामंत यांचा तसेच सुनिल मोरजकर, जि.प.बांधकाम अभियंता दत्तात्रय सावंत, शाखा अभियंता सुहास टेंबकर, विकासक सचिन गडेकर, अनुश्री कांबळी, सिद्धेश परब, गटविकास अधिकार उमा पाटील, सदस्य बाळू परब यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu