वेंगुर्ल्यातील लघुपट कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रबोधन गोरेगांव व माझा वेंगुर्लायांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. खर्डेकर महाविद्यालयात लघुपट निर्मिती आणि मार्केटींग व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रपटपरीक्षक व समिक्षक अशोक राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार व तंत्रज्ञ मनोज राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संचालक विजू गावडे, ‘माझा वेंगुर्लासंस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, कलावलय संस्थेचे संजय पुनाळेकर आदी उपस्थित होते. लघुपट निर्मिती स्पर्धेत या जिह्यातील युवक व युवतींनी कार्यशाळेतील मार्गदर्शनानुसार सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष गिरप यांनी केले.

      वेंगुर्ल्यात निर्मिती केलेला लघुपट हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करु असे प्रतिपादन अशोक राणे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. या कार्यशाळेमध्ये जवळपास ५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. प्रत्येक माणूस आपला इतिहास, भुगोल घेऊन जगत असतो आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रतिबिबीत होत असतो. त्यामुळे त्याच्या निर्मितीपासून त्याचे लेखन, दिग्दर्शन, सिनेमा ग्राफिक, एडिटिंग व मार्केटिंग आदी चित्रपटांच्या विविध अंगांबाबत बारकावे सांगत उदाहरणासहित मार्गदर्शन केले. त्यासाठी ३ ते ४ शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्या आणि त्यातील विविध अंगांचा बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत सखोल माहिती देण्यात आली. तसेच शॉर्ट फिल्मचे मार्केटिंग कसे उभे करावे व त्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवावे याबाबत ही मनोज कदम यांनी मार्गदर्शन केले.

     यावेळी माझा वेंगुर्लासंस्थेचे राजन गावडे, अवधुत नाईक, प्रा.आनंद बांदेकर, सुनिल डुबळे, प्रा.वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, सुनिल नांदोस्कर, वसंत तांडेल, प्रा.वामन गावडे आदी उपस्थित होते. निलेश चेंदवणकर, वसंत तांडेल यांनी स्वागत केले. तर संजय पुनाळेकर यांनी मान्यवरांचा परिचय, प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Close Menu