दिपेश परब

मदत सामाजिक संस्था, नागपूर संस्थेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ शाळांमधील ११२ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेणा-या, फणसवडेतील महिला बचत गटातील महिलांना ५,३५,५२५ /- रक्कमेतून कर्जमुक्त करणा-या, शैक्षणिक सामाजिक समाजकार्य करत शाळा गाव ते राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय विविध सन्मान पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीयरत्न भारत भूषण, आंबोली येथील रहिवासी तथा शाळा मठ नं. २ चे शिक्षक डॉ.चंद्रकांत तुकाराम सावंत यांची क्रांतिबा- क्रांतिज्योती शैक्षिणक समाज सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कारासाठी, राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार तसेच विविध पत्रकार सन्मान प्राप्त, कोकणचे महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचे तालुका प्रतिनिधी मातोंड येथील पत्रकार दिपेश दिपक परब यांची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१, सामाजिक कार्यकर्ते वैभव वसंत राऊळ आंबोली सावंतवाडी यांची छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार २०२१ तसेच संजय गोपाळ गोसावी उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि.प पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं.१, महादेव आप्पा असरोंडकर पदवीधर शिक्षक जि.प. शाळा किर्लोस-गावठण मालवण आणि सावंतवाडी तालुक्यातील अरविंद नारायण सरनोबत उपशिक्षक प्राथमिक शाळा धवडकी व विद्याधर महादेव पाटील शिक्षक जि.प.शाळा गेळे बाळेभाटले यांची सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार २०२१साठी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या १९व्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ डिसेंबर रोजी गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Close Menu