►नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह व शॉपिगचे १९ रोजी उद्घाटन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉलचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. दरम्यान१९२०२१ डिसेंबर असा तीन दिवसीय आरंभ उत्सव‘ साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      नगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. गिरप म्हणाले कीनाटककार मधुसूदन कालेलकर बाहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉल हा वेंगुर्ला नगरपरिषदेचा या ५ वर्षातील सर्वात मोठा प्रकल्प असून याचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. यात १९ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर बाहुद्देशिय सभागृहशॉपिंग मॉल इमारतसंपूर्ण ४० व्यापारी गाळे यांचे लोकार्पण दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेमाजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसपालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊतआमदार दीपक केसरकरआमदार रविद्र चव्हाणआमदार नितेश राणेवैभव नाईकनिरंजन डावखरेअनिकेत तटकरेजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ९ वाजता बेधुंद क्षण‘ सेलिब्रिटी गायकांचा बहारदार ‘‘ऑर्केष्ट्रा‘ होणार असून रचित अग्रवालप्रियांशी श्रीवास्तव या गायकांसहीत १५ ते १६ वाद्यवृंद यांचा असणार यात सामावेश आहे.

      २० डिसेंबरला संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनातील कर्मचारी यांचा सन्मान सोहळा तसेच या ५ वर्षाच्या कारकिर्दीत लाभलेले मुख्याधिकारी रामदास कोकरेवैभव साबळे व डॉ.अमितकुमार सोंडगे यांचाही नगरपरिषद नगराध्यक्षउपनगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांच्या वतीने सत्कार होणार आहे. त्यानंतर नगरपरिषद मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटनटेबल टेनिसकॅरमबुद्धिबळशूटिंगस्विमिंगरनिंग व लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आदींचा बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता रविद्र देवधर यांचे ‘‘मी भारतीय‘‘ ही द्वीपात्री नाटिका होणार असून रात्री ९.३० वाजता कवी आरती प्रभू रंगमंचाचे मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र अनिल कालेलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित जनार्दन लवंगारे दिग्दर्शित बायको कमाल मेहुणी धमाल‘ हे कॉमेडी नाटकही सादर होणार आहे.

      तर २१ रोजी संध्याकाळी ६ ते ८ वाजता जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग आणि रात्रौ ९.३० वाजता दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. असा ३ दिवसीय भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे. यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकरगटनेते सुहास गवंडळकरनगरसेवक प्रशांत आपटेप्रशासकीय अधीक्षक संगीता कुबलमाखवेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu