जिल्हा भंडारी महासंघातर्फे वधू-वर सूचक मेळावा

वेंगुर्ला-साई मंगल कार्यालयात २ जानेवारी सिधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सेक्रेटरी विकास वैद्य, मोहन गवंडे, विलास आसोलकर, सीताराम खडपकर, उल्हास हळदणकर, समील जळवी, राजू गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, दिलिप पेडणेकर, सुनील नाईक, अनंत कांबळी, मनोहर पालयेकर, निलेश गोवेकर, तुकाराम करंगुटकर, लक्ष्मीकांत मुंडीये यांच्यासह अन्य सदस्यही उपस्थित होते.

    जिल्हा भंडारी महसंघातर्फे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वधुवर सुचक मेळावा घेण्यात येणार असून त्याची तारीख निश्चित झाली नसली तरी यात सहभागी होणा-या वधुवरांनी आपली नावे ९६२३७२७९२० यावर कळवावीत असे आवाहन केले आहे. या सभेत निलेश गोवेकर (कणकवली) यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. तर महासंघाच्या अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. वधूवर मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष वायंगणकर यांनी सर्वांना सूचनाही केल्यात.

Leave a Reply

Close Menu