नविन कार्यकारिणी येईपर्यंत विकास कामांचा दर्जा टिकवा

नोव्हेंबर २०१६ मध्ये पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचा व लोकनियुक्त नगराध्यक्षांचा कार्यकाल २१ डिसेंबर रोजी संपला. या पाच वर्षांच्या कालावधीत नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांचे एक भावनिक नाते निर्माण झाले होते. हाच धागा पकडून नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा स्नेहमेळाचा ४ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडला.

      सत्ताधारी, विरोधक व प्रशासन हे एक कुटुंब आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही नगरपरिषदेच्या रथाची दोन चाके आहेत. सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने काम केल्यास सर्व काही शक्य होऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेने पाच वर्षात केलेली अद्वितीय अशी विकास कामे आहेत. नगरपरिषदेची नविन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत विकास कामांचा दर्जा टिकविण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.

      यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, विरोधी गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, विधाता सावंत, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, कुतिका कुबल व आत्माराम सोकटे तसेच मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      सर्वांनी एकत्रित येवून मागाील पाच वर्षात केलेल्या कार्याचा उल्लेख करताना आपल्या आठवणींनादेखील उजाळा दिला. नगरपरिषद प्रशासनामार्फत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा तसेच नगरसेवकांना मागाील पाच वर्षात केलेल्या अद्वितीय विकास कामांचा फोटो अल्बम भेट म्हणून देण्यात आला.

 

Leave a Reply

Close Menu