कलावलयतर्फे नाट्यकर्मी व नाट्य संस्थांचा सत्कार

कलावलय वेंगुर्ला संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात, कवी आरती प्रभू रंगमंचावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथितयश नाट्यकर्मी नाट्य संस्था यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      यामध्ये प्रसाद खानोलकर, अतुल महाजन, प्रकाश परब, रमेश नार्वेकर, राजीव शिंदे, चंदू शिरसाट, विजय चव्हाण, वामन पंडित, सुहास वरुणकर, अभय खडपकर, श्याम नाडकर्णी, प्रकाश कुशे, विजयकुमार फातर्फेकर यांचा तसेच जिल्ह्यात एकांकिका, नाट्यस्पर्धा घेऊन नाट्यचळवळ जीवंत ठेवणाया ओंकार सांस्कृतिक कला, क्रिडा मंडळ वेंगुर्ला, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ, साई कलामंच पिंगुळी, नाट्यदर्शन सावंतवाडी, स्वयंभू कला, क्रिडा मंडळ आजगांव, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली, परुळे युवक कला, क्रिडा मंडळ, अक्षरसिंधु कणकवली या नाट्यसंस्थांचा समावेश होता.

      नाट्यकर्मी नाट्यसंस्थांचा केलेला सन्मान आम्हाला प्रेरणा देईल. तसेच कलावलय ही संस्था सुवर्ण नव्हे, तर शतकमहोत्सव साजरा करेल प्रतिपादन सिने, नाट्य, कला अभिनेते अभय खडपकर यांनी केले. बीकेसी वेंगुर्ला अध्यक्ष सतिश डुबळे, बीकेसी असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष गोविंद उर्फ विजू गावडे, कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचाही सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu