कलावलय वेंगुर्ला आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मंडळीपिंगुळीच्याबिलिमारोया एकांकिकेस सांघिक प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर कलाकार्स थिएटर ठाणेच्यालेखकने द्वितीय आणि गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्याइट हॅपन्सने तृतीय क्रमांक पटकावला. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळच्याबोझया एकांकिकेला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. विजेत्या सर्व संघ कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

      वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात कवी आरती प्रभू रंगमंचावर घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एकुण 17 नाट्यसंघानी सहभाग घेतला होता. दिग्दर्शनमध्ये प्रथमतेजस मस्के, (बिलिमारो)-पिंगुळी, द्वितीयसागर जेठवा (लेखक)-ठाणे, तृतीयअनुपम दाभाडे (इट हॅपन्स) कोल्हापूर, पुरुष अभिनयप्रथमप्रथमेश चुबे, (लेखक) कोल्हापूर, द्वितीयविठ्ठल तळवलकर (बिलिमारो) पिंगुळी, तृतीयअवधूत सावंत (इट हॅपन्स) कोल्हापूर, स्त्री अभिनयप्रथमजान्हवी गर्दे (दिव्या)कोल्हापूर, द्वितीयसिध्दी शिंदे (लेखक)ठाणे, तृतीयमानसी पवार (सिटीलाईट) मुंबई, नेपथ्यप्रथमसचिन कोंडस्कर (बिलिमारो)पिंगुळी, प्रकाश योजनाप्रथमसचिन कोंडस्कर (बिलिमारो)-पिंगुळी, पार्श्वसंगितप्रथमरोहन चव्हाण, विवेक पाटणकर, रोशन चव्हाण (बिलिमारो) पिंगुळी, अभिनय प्रमाणपत्र पुरुषविराज आरोंदेकर (जन्मजन्मांतर) दाभोलीकिर्तीकुमार पाटील (लव्ह अँड अरेंज), स्त्री अभिनयअंकिता चिंदरकर (सेकंड हॅन्ड)कणकवली, साक्षी मांजरेकर (बोझ) कुडाळ, कांचन खानोलकर (कॅडिलोस्कोप), झीरो बजेट प्रॉडक्शन, श्रध्दा परब (लज्जा द्यावी सोडून) कणकवली, धनश्री गाडगीळ (समांतर)सांगली यांना देण्यात आली.

      स्पर्धेचे बक्षिस वितरण कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, सचिव दिगंबर नाईक, संजय पुनाळेकर, माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप, सुनिल रेडकर, पी.के.कुबल, परीक्षक सुहास भोळे, संजय हळदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाटी जीतेंद्र वजराटकर, विनायक जोशी, प्रविण सातार्डेकर, पंकज शिरसाट, सीमा मराठे, सेजल भाटकर, कृष्णा राऊळ, मयुर वेंगुर्लेकर, विकी आजगावकर, चतुर पार्सेकर, हर्षदा बागायतकर, बापू वेंगुर्लेकर, मेलविन डिसोजा, गौरव वायंगणकर बी.के.सी.असोसिएशन वेंगुर्ला, मुंबई कलावलयच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार शशांक मराठे यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu