वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर झाले असून यात कै.प्रभाकर अनंत उर्फ शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारतचे भरत सातोस्कर, कै. अरुण काणेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दै.पुढारीचे मॅक्सी कार्डोज, पत्रकार कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार दै. सामनाचे विनायक वारंग यांना व कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती आदर्श महिला जिल्हास्तरीय पुरस्कार साप्ताहिक किरातच्या संपादिका सीमा मराठे यांचा समावेश आहे.

      वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीची बैठक नुकतीच पत्रकार समितीच्या तालुका कार्यालयात समितीचे अध्यक्ष प्रदिप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पत्रकार के.जी.गावडे, दाजी नाईक, अजित राऊळ, विनायक वारंग, भरत सातोस्कर, मॅक्सी कार्डोज, एस.एस.धुरी, दिपेश परब, सुरज परब, अजय गडेकर, योगेश तांडेल, सीमा मराठे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक यांचे वडील चंद्रकांत नाईक, सहसचिव विनायक वारंग यांचे काका कमलाकांत वारंग व पत्रकार समितीचे सदस्य शंकर घोगळे यांच्या पत्नी शांभवी घोगळे व सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    दै. तरुण भारतचे प्रतिनिधी के.जी.गावडे यांना कुडाळ पत्रकार समितीचा कै.भैय्यासाहेब वालावलकर स्मृती उत्कृष्ठ जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल, दै. तरुण भारतचे तुळस वार्ताहर आपा परब यांना जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल व दै. सकाळचे तालुका प्रतिनिधी दिपेश परब यांना नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu