वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहावी ते महाविद्यालयीन गटामध्ये होणार असून यासाठी सुमारे ५०० ते ७०० शब्दमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
कोरोना काळात शिक्षण व्यवस्था, सेवा क्षेत्रातील रोजगार यावर दूरगामी परिणाम झाले आहेत. स्वतःची जीवनशैली, उद्दिष्ट, आर्थिक स्तर, आरोग्य, कौटुंबिक वातावरण याचे संदर्भच आपत्तीने बदलले आहेत. पण निर्माण झालेल्या आपत्तीला युवापिढी कशी सामोरी जात आहे? त्यांच्या समोरील आव्हाने काय आहेत? त्यांनी स्वतःचे शिक्षण कशाप्रकारे सुरु ठेवले? रोजगाराचे नवे मार्ग कसे शोधत आहेत? याविषयी निबंध लिखाण अपेक्षित आहे.
निबंध शब्दमर्यादेच्या बाहेर गेल्यास तो निबंध स्पर्धेसाठी स्विकारला जाणार नाही. सदर निबंध स्पर्धकांनी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत युनिकोडमध्ये टायपिग करुन ssmarathe8719@gmail.com या मेल आयडीवर किवा ९६८९९०२३६७ या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावा. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १००१, ७०१, ५०१ व उत्तेजनार्थ दोन अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात पत्रकार संघाच्या होणा-या पुरस्कार वितरण कार्यक्रमात याचे बक्षिस वितरण होणार आहे.