चांगल्या नियोजनाने पाणी देणे सुलभ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन यावर वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे दोन दिवशीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळा आयोजित केली होती. याचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, परीदिक्षाधीश अधिकारी संजिता महोपात्रा, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकूर, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता नरेंद्र साळुंखे, तंत्र अधिकारी परिक्षित चितोडे, पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविद्र मुळे आदी उपस्थित होते.

     जलजीवन मिशन व सांडपाणी व्यवस्थापन या जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये सर्वांनी समन्वयाने प्रशिक्षणाचे मुद्दे चांगल्या रितीने आत्मसात करावे. जिल्हास्तरावर तालुकास्तरावर चांगले नियोजन केल्यामुळे जास्तीत जास्त निधी प्राप्त होणार असून लोकांना पाणी देणे सुलभ होणार आहे असे प्रतिपादन संजना सावंत यांनी केले. तर जिल्हा मुळातच स्वच्छताप्रिय आहे. आता पाणी व्यवस्थापनाकडे प्राधान्याने, समन्वयाने, लोकसहभागाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये नियोजनबद्ध काम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन प्रजित नायर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu