वेंगुर्ला रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी रुजू होणार!

ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारिकांजवळ औषध निर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिला जातो. परंतु, ते काम करणे शक्य नसल्याने अधिपरिचारिकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात शिरोडा येथील औषधनिर्माण अधिकारी आठवड्यातील दोन दिवस येणार तर तालुक्यातील शाळा तपासणी औषध निर्माण अधिकारी रुग्णालयात शाळा नियमित सुरू होईपर्यंत कार्यरत राहणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी १७ जानेवारीपासून बाह्यरुग्ण तपासणी बंद न ठेवता ती सुरु ठेवली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu