वेंगुर्ला-कुडाळ रस्त्याचे आमदार केसरकर व नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला-मठ-कुडाळ-पणदूर-हुमरमळा-जांभवडे-घोटगे-गारगोटी या राज्यमार्ग १७९ रस्त्यावरील ११. ८५० किमी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण या कामाचे तसेच याच रस्त्यावरील वेतोरे शंभू भवानी स्टॉप नजिकच्या पुलाचे बांधकाम करणे या कामाची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वेतोरे येथे संपन्न झाले.

     ५०/५४ मार्ग पुल यावरील भांडवली खर्च अंतर्गत सुमारे १२ किमी रस्त्यासाठी २.५ कोटी तर पुलासाठी सुमारे १ कोटी ३७ लाख रक्कमाना मंजुरी देण्यात आली आहे. आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली. यावेळी एम.के.गावडे, यशवंत परब, सुनिल डुबळेअजित राऊळ, वेतोरे सरपंच पपू चिचकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, नंदन वेंगुर्लेकरस्वप्नील चमणकर, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, सुकन्या नरसुले, मंजुषा आरोलकर, निलेश नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.   

     या रस्त्याला २ वर्षापूर्वीच पैसे दिले होते. मात्र कोरोनाचा काळ असल्याने या प्रतिबंध उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे कामे मागे राहिली होती. आता ती सर्व कामे सुरू झाली आहेत. दरम्यान या रस्त्या व पुला संदर्भात कंत्राटदारांना योग्य सूचना देण्यात आल्या असून कामात दिरंगाई झाल्यास पर्यायी कडक पावले उचलण्यात येतील असे आमदार केसरकर यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Close Menu