लता मंगेशकरांना शिवाजी विद्यापीठाने दिली डी.लिट.

लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठातर्फे बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर 1978 मध्ये डी.लिट. देऊन  सन्मानित केले. तत्कालीन कुलगुरू डॉ. भा. शं. भणगे यांनी लता मंगेशकर यांना डी.लिट. देताना कोणता निकष लावला होता, अशी विचारणा झाली होती. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर अतिशय समर्पक होते. डॉ. भणगे एकदा विद्यापीठाच्या कामानिमित्त दौऱ्यावर असतांना भर दुपारी रखरखत्या उन्हात एक शेतकरी बांधाकडेला रेडिओवर लताजींचे गाणे ऐकत बसला होता. गाडी थांबवून त्या शेतकऱ्याला त्यांनी विचारले. तुम्हाला कुणाची गाणी आवडतात, त्यावर शेतकऱ्याने लताजींच्या गाण्यांनी माझा कष्टाचा शीण निघून जातो. मला विरंगुळा मिळतो. म्हणून मी शेतात काम करतानाही लताजींचे गाणे ऐकण्यासाठी सकाळी येतानाच दुपारच्या जेवणाबरोबर रेडिओ आणतो, असे सांगितले. त्या वेळेलाच डॉ. भणगे यांनी लताजींना डी.लिट. देण्याचा संकल्प केला.

    (सौजन्य- ॲड. अजित भणगे, कुडाळ)

Leave a Reply

Close Menu