►महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत हापूस आंबा पेटी थेट विक्रीसाठी

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचे पार्श्वभूमीवर मागील  2 वर्षे अनेक अडचणींचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागत होता. मात्र चालू वर्षासाठी आंबा उत्पादकांची आंबा विक्री करिता स्टॉल उपलब्ध होण्याकरिता नोंदणी दि. 7 मार्च पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली.

   स्टॉल नोंदणी करिता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागील सहा महिने कालावधीतील), आधारकार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधारकार्ड प्रत व लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मंडळाचे नावे रुपये 10,000 अनामत रकमेचा धनादेश अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केलेली असल्यास पावतीची प्रत तसेच विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इत्यादी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय, शांतीनगर-नाचणे, रत्नागिरी 02352-299328 अथवा  कृषी व्यवसाय पणन तज्ञ- कपिल खामकर 8805652233 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. असे आवाहन कृषी पणन मंडळाचे वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Close Menu