नविन वर्षाच्या स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यासह ढोलताशांच्या गजरात वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रा काढून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेत शेकडो हिंदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगाराई नष्ट होवो यासाठी प्रारंभी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर या स्वागतयात्रेला सुरुवात झाली. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा, जुना एसटी स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता झाली.

Leave a Reply

Close Menu