श्रीया सावंत

अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात राहणारी सिधुदुर्गची सुकन्या श्रीया सावंत हिने नासातर्फे आंतरराष्ट्रीयस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या लुनार रबोटिक्स डिझाईन कॉन्टेस्टमध्ये प्रथम पटकावत सिधुदुर्गचा झेंडा आंतरराष्ट्रीयस्तरावर फडकवला. स्पेस सायंटिस्ट बनण्याचे स्वप्न बाळगून असलेली श्रीया ही १५ वर्षांची असून तिच्या या कामगिरीचा गौरव म्हणून नासाने जागतिकस्तरावर प्रसारित होणा-या आपल्या होम पेजवर तिला स्थान दिले आहे.

श्रीयाची आई सुहासिनी सावंत या वेंगुर्ल्याच्या असून वडील गणेश सावंत हे वेतोरे गावचे सुपुत्र आहेत. तर वेंगुर्ला-भटवाडी येथील शिवदत्त सावंत व संगणक तज्ज्ञ मार्तंड सावंत यांची श्रीया ही भाची आणि किरातच्या  लेखिका प्रतिभा सावंत यांची ती नात होय.

Leave a Reply

Close Menu