डॉ. वसुधाज् योगा अकॅडमीचे यश

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या लेव्हल-2 (वाय.सी.बी.लेव्हल-2) म्हणजेच योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर या अतिशय उच्च दर्जाच्या आणि जागतिक पातळीवर घेतल्या जाणा-या योग प्रशिक्षण देण्यास मान्यताप्राप्त अशा परीक्षेत वेंगुर्ला येथील डॉ.वसुधाज्‌ योगा ॲण्ड फिटनेस अकॅडमीने यावर्षीही 75 टक्के एवढी निकालाने परंपरा राखली आहे.

      या परीक्षेस बसलेल्या 8 पैकी 6 विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये प्रथम-स्वाती सावंत (बांदा)-75 टक्के, द्वितीय-डॉ.दीपाली पालयेकर (वेंगुर्ला)-74 टक्के, तृतीय-अंकिता जाधव (मुंबई)-73 टक्के, चौथी-रिद्धी नेवरेकर (रत्नागिरी)-72 टक्के, पाचवी-सुजाता दळवी (दोडामार्ग)-71 टक्के, सहावी-शितल गवस (बांदा)-70 टक्के यांचा समावेश आहे. या सर्वांना डॉ.वसुधा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी साधकांचे डॉ.वसुधा मोरे, डॉ.योगेश नवांगुळ, नारायण अंधारी, समिक्षा वालावलकर, वृंदा मोर्डेकर, अक्षता मांजरेकर व अंबरिश मांजरेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu