अभिजित महाले यांना पीएचडी

वेंगुर्ला येथील रहिवासी व बांदा-पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे अकौंटन्सी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक अभिजीत महाले यांना अलिकडेच मुंबई विद्यापीठाची पीएचडी ही संशोधनपर पदवी घोषित करण्यात आली. त्यांनी ‘इको टुरीझम इंडस्ट्री : ॲन इंजिन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ सिंधुदुर्ग’ यावर संशोधन करून विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. संशोधन प्रबंधाचे परिक्षण धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठ आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी केले. संशोधनासाठी दहिसर-मुंबई येथील माजी प्राचार्य डॉ. व्ही. एम.इंगवले यांनी मार्गदर्शन केले. गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षण प्रसारक मंडळ बांदा यांचे अध्यक्ष डी.बी.वारंग, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव सावंत व सर्व पदाधिकारी तसेच गोगटे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद, नागरिक व व्यावसायिक यांनी अभिजीत महाले यांचे अभिनंदन केले आहे. वेंगुर्ला येथील ज्येष्ठ व्यापारी व समाजवादी कार्यकर्ते पंढरीनाथ महाले यांचे ते सुपुत्र होत.

Leave a Reply

Close Menu