ऋषी देसाई यांना शिव छत्रपती महाराष्ट्र भूषण पुरस्कार

पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान झाला पाहिजे, या उद्देशाने कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान, कंधारतर्फे दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई (मुंबई) यांना सन २०२१चा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला असून ३० एप्रिल रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कंधार येथे वितरीत केला जाणार आहे.

          ऋषी देसाई यांनी यापूर्वी साम मराठी, झी २४ तास, टीव्ही नाईन मराठी या अग्रगण्य वृत्त वाहिन्यांवर स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. समिक्षा‘, ‘प्राईम वॉच‘, ‘डोळ्यानं पाहिन रुप तुझेअशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले वेगळेपण मांडताना लोकशाही न्यूजवरील ऋषी देसाईचा फटकाहा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारा कार्यक्रम प्रेक्षकांबसोबत टेलिव्हिजन रेटिग पॉईंटवर आपली छाप उमटवत आहेत. मालवण बोलीभाषेतील लेखनासह राजकीय, लेखक अशी देसाई यांची विशेष ओळख आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी ऋषी देसाई हे पत्रकारांना नव्या माध्यमातील पत्रकारिताया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Close Menu