स्वाती वालावलकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलयाच्या मुख्याध्यापक व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती रविंद्र वालावलकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२२ प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे ओरोस येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अजय शिंदे, गुरुनाथ पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, अश्विनी गर्जे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण, कुशल प्रशासक व सर्वसमावेशक शाळाप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श ठसा उमटविला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu