प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ जाहीर

पत्रकारितेबरोबरच समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पत्रकारांना वेंगुर्ला येथील ‘किरात ट्रस्ट’तर्फे  ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार’ देण्यात येतो. यापूर्वी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिंधुदुर्गातील 7 पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार, किरात व दै.लोकमतचे प्रतिनिधी प्रथमेश गुरव यांना जाहीर झाला आहे. प्रथमेश याने वार्तांकनासोबत समाजातील विविध विषयांवर साप्ताहिक किरात व दै. लोकमतमधून उत्कृष्ट लेखन करुन समाजातील ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. या व्यतिरिक्त दशावतार कलेची आवड जोपासताना श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाची स्थापना करुन अनेक बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. स्वत: दशावतारामध्ये पखवाज वादन व नाट्यलेखनही करीत आहेत. तसेच वारकरी भजनाला उत्कृष्ट पखवाजाची साथ देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.   

          14 मे रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात सायंकाळी 4 पासून संपन्न होणाऱ्या किरात साप्ताहिकाच्या शताब्दी स्नेहमेळावा कार्यक्रमात श्री.गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रथमेश हा वेंगुर्ल्यातील ग्रामदैवत श्री रामेश्वर देवस्थानचे पूर्वीचे व्यवस्थापक कै. काका गुरव यांचा नातू तर वारकरी भजनी बुवा विजय गुरव यांचा मुलगा होय.

Leave a Reply

Close Menu