शिवराम गोगटे यांना कृषीभूषण पुरस्कार प्रदान

वेतोरे-पालकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवराम गोविंद गोगटे यांना सन 2017 साली जाहीर झालेला वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न नागरीक पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी धीरवाळ यांसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu