वसा चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत – बालमुकुंद पत्की

वृत्तपत्र चालविताना येणारी संकटे आणि लोकांना द्यावे लागणारे तोंड याची आम्हाला कल्पना आहे. १९९२ ते २००२ पर्यंत तरुण भारतचा सिधुदुर्ग आवृत्ती प्रमुख असताना श्रीधर मराठे यच्याशी ओळख झाली. त्यांचे कष्ट मी पाहिले आहेत आणि त्यांचाच वसा शशांक आणि सीमा मराठे हे आता चांगल्यापद्धतीने पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक बालमुकुंद पत्की यांनी किरातच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी काढले.

      वेंगुर्ला येथील किरातने जानेवारी २०२२मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून या शताब्दी वर्षानिमित्त १४ मे रोजी शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात झालेल्या या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, दै. तरुण भारतचे सिधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदक शिबानी जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, किरात ट्रस्टचे विश्वस्त रघुवीर उर्फ भाई मंत्री, गुणवंत मांजरेकर, मनमोहन दाभोलकरजे.जे.आर्टस् स्कूलचे निवृत्त प्रा.सुनिल नांदोस्कर, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे, किरातच्या संपादक सीमा मराठे आदी उपस्थित होते. तर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाईन तर दै.तरुण भारतचे समुह संपादक किरण ठाकूर, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, ‘कालनिर्णयचे संपादक जयराज साळगांवकर, आयडीएल बुक डेपोचे मंदार नेरुरकर, किरातचे विश्वस्त दादासाहेब परुळकर, प्रमोद चांदेरकर, मोहन मराठे यांनीही शुभेच्छा दिल्या.

      प्रथा, परंपरा, राजकीय घडामोडींसह अन्य सर्वंकष घडामोडींच्या इतिहासाचा साक्षिदार म्हणजे किरात आहे. किरातने फक्त वृत्तपत्रच नाहीतर वारसाही जपला आहे. लोकल टु ग्लोबलअसा सुरु असलेल्या त्यांच्या प्रवासाबाबत अॅड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी गौरवोद्गार काढले. तसेच ज्या रंगमंचाला नाटककार मधुसूदन कालेलकर हे नाव देण्यात आले ते कालेलकर आणि आपले वडील हे बालमित्र होते, त्याबाबत त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला. 

      सर्वसामान्यांसाठी योग्य विचारसरणी असलेल्या किरातने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. किरातची चौथी आज कार्यरत आहे. यापूर्वीचे संपादक श्रीधर मराठे आपल्या गोड भाषेत आम्हाला काही सूचक आणि योगय सूचनाही द्यायचे असे प्रविण भोसले यांनी बोलताना सांगितले. शशांक आणि सीमा मराठे यांनी जे कठीण होत ते सोप करुन दाखविले आणि किरात यशस्वीरित्या सुरु ठेवला. त्यामुळे किरात हा आम्हा वेंगुर्लावासीयांचा अभिमान असल्याचे उद्गार मनिष दळवी यांनी काढले.

      शंभरी पार केलेल्या तरुण भारतने शंभरीत पदार्पण केलेल्या किरात साप्ताहिकाबद्दल गौरवोद्गार काढले. तरुण भातरचे संपादक किरण ठाकूर यांना प्रकृतीच्या कारणामुळे येता न आल्याने त्यांनी किरातप्रतीच्या पाठविलेल्या भावना शेखर सामंत यांनी वाचून दाखविल्या. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. त्यांचाच वारसा जपताना वृत्तपत्रसृष्टीमध्ये आपला वेगळा ठसा उमटविण्याचे काम किरातने केले असल्याची भावना शुभेच्छापत्रातून व्यक्त केल्या. शेखर सामंत यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या.   शंभर वर्षापूर्वी सिधुदुर्गात बॅ.नाथ पै आणि किरात यांनी जन्म घेतला आणि या दोघांनी आपला प्रभाव सिधुदुर्गावर टाकला असल्याची माहिती अॅड.देवदत्त परुळेकर यांनी देताना नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करुन किरात पुढे वाटचाल करीत असल्याबाबत अभिनंदन केले. ज्यावेळी सोशल मिडिया अस्तित्त्वात नव्हती त्यावेळी किरात मुख्य भूमिका बजावत होते. एखादी घटना किरातच्या माध्यमातून घराघरात पोहचते आणि चाकरमानी त्याचा उल्लेख करतात त्यावेळी किरातबद्दलची आपुलकी, प्रेम दिसून येते असे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. शंभरवर्षांची कारकिर्द किरात यशस्वीपणे पार केली. याही पुढे किरातची वाटचाल वेगाने सुरु राहो अशा शुभेच्छा किरातचे विश्वस्त भाई मंत्री यांनी बोलताना दिल्या.

      कार्यक्रमाची सुरुवात कु.नीरजा माडकर व केतकी आपटे यांच्या नृत्याविष्काराने झाली. त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत मसगे आणि त्यांच्या सहका-यांनी राजा शाकुणया पौराणिक कथेवर कळसुत्री बाहुल्यांचा खेळ सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर भाव अंतरीचे हळवेफेम मयुर गवळी व दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर यांच्या उत्कृष्ट साथसंगतीत रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाने चितामणीहा नाट्यप्रयोग सादर केला. प्रसिद्ध गायक गुरु ठाकूर यांची मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदक शिबानी जोशी व अॅड.शशांक मराठे यांनी तर आभार माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

      स्नेहमेळाव्याची सांगता डॉ. प्रतिक गायकवाडा यांच्या आवाज चांदण्यांचेया संगीत मैफिलीने झाली. या कार्यक्रमाचे निवेदन अर्पणा परांजपे-प्रभू यांनी केले. 

Leave a Reply

Close Menu