किरात शताब्दी निमित्त कृतज्ञता आणि प्रेरणा पुरस्कारांचे वितरण

किरात शताब्दी वर्षाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिची दखल घेऊन त्यांना कृतज्ञता तसेच प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      यात ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते भाव अंतरीचे हळवेफेम मयुर गवळी व दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर यांना, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते रानमाणूस प्रसाद गावडे यांना, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते स्टोन आर्ट कलाकार ऋतिका पालकर यांचा आणि वेंगुर्ला तालुक्याच्या आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि पर्यावरण यासाठी सातत्याने कार्यरत असणारी माझा वेंगुर्लासंस्था यांना प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कारगौरविण्यात आले. तर ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांना किरातचे विश्वस्त रघुवीर मंत्री यांच्या हस्ते,

साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करुन नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणा-या वृंदा कांबळी यांना गुरु ठाकूर यांच्या हस्ते, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ज्येष्ठ संपादक बालमुकुंद पत्की यांच्या हस्ते आणि जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचे निवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर यांना किरातचे विश्वस्त मोहनराव केळुसकर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.

      याच पुरस्कारांसोबतच रघुवीर मंत्री यांच्या हस्ते गीतकार गुरु ठाकूर यांचा, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या हस्ते बालमुकुंद पत्की यांचा, अॅड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या हस्ते पत्रकार शेखर सामंत यांचा, किरातचे विश्वस्त मोहनराव केळुसकर यांच्या हस्ते मनिष दळवी यांचा, दिलीप गिरप यांच्या हस्ते प्रविण भोसले यांचा, अॅड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते अॅड.निर्मला सामंत-प्रभावळकर व दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदक शिबानी जोशी यांचा, रघुवीर मंत्री यांच्या हस्ते अॅड.देवदत्त परुळेकर यांचा, बालमुकुंद पत्की यांच्या हस्ते रघुवीर मंत्री यांचा तर माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्या हस्ते किरातचे विश्वस्त गुणवंत मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

      उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किरातचे कर्मचारी वासुदेव तुळसकर, सुधाकर सावंत, पांडुरंग साळगांवकर, लक्ष्मण कांबळी, सूर्यकांत बागवे, बॉरीस फर्नांडीस, प्रथमेश गुरव, अशोक कोलगांवकर यांचाही सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu