प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ प्रदान

पत्रकारितेसोबत बाल दशावतार चळवळीला चालना देऊन अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या वेंगुर्ल्यातील पत्रकार प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांना श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कारजाहिर झाला होता. हा पुरस्कार असून १४ मे रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या किरातच्या शताब्दी कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते श्री. गुरव यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  

      पत्रकारितेबरोबरच समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या पत्रकारांना वेंगुर्ला येथील किरात ट्रस्टतर्फे  श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कारदेण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार, किरात व दै.लोकमतचे प्रतिनिधी आणि दशावतार कलेची आवड जोपासताना श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाची स्थापना करुन अनेक बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या, स्वतः दशावतारामध्ये पखवाज वादन व नाट्यलेखन करणा-या आणि वारकरी भजनाला उत्कृष्ट पखवाजाची साथ देणा-या प्रथमेश गुरव यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, दै. तरुण भारतचे सिधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदक शिबानी जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, किरात ट्रस्टचे विश्वस्त रघुवीर मंत्री, गुणवंत मांजरेकर, मनमोहन दाभोलकर, अॅड.शशांक मराठे, जे.जे.आर्टस् स्कूलचे निवृत्त प्रा.सुनिल नांदोस्कर, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे, किरातच्या संपादक सीमा मराठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu