सुरेश कौलगेकर यांना बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य व सिंधुदूर्ग जिल्ह्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा जय महाराष्ट्र चॅनेलचे सिंधुदूर्ग प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांना पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित झाला आहे.

      मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात येणा-या सन २०२२च्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराची घोषणा देवगड-पोंभूर्ले येथे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७६व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रविद्र बेडकिहाळ यांनी घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.

      सुरेश कौलगेकर यांनी कोकण सारख्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेक दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान व त्यांच्या प्रश्नांनाना व्यासपीठ देण्याचे कार्य केले. समाजिकतेबरोबरच क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी, क्राईम विषयक घटना यांना पत्रकारितेतून न्याय दिला. त्यांच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. आजपर्यंत त्यांना राज्यस्तरीय आमदार गुरुनाथ कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय गुरुकुल पुरस्कार २०१२, वेताळ प्रतिष्ठानतर्फे २०१७चा राज्यस्तर आदर्श पुरस्कार त्याच तालुका, जिल्ह्यास्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना विशेष सोयी सवलतीचा लाभ मिळवून देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

Leave a Reply

Close Menu