‘अतुल्य’च्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘किरात दिवाळी अंक’ सर्वोत्कृष्ट

गणपतराव कदम मार्ग मनपा माध्यमिक शाळा या वरळी-मुंबई स्थित शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘अतुल्य सेवा संस्था’ नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे वृद्ध, अपंग, अनाथ नागरिकांची मोफत सेवा केली जाते. अन्नदानही केले जाते. यंदा या संस्थेने दिवाळी अंक स्पर्धांचे प्रथमच आयोजन केले होते. यात सहभागी झालेल्या 22 अंकांमधून सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून वेंगुर्ला येथून प्रसिद्ध होणा-या ‘किरात दिवाळी’ अंकाची निवड करण्यात आली आहे. द्वितीय क्रमांक ‘गंधाली’ मुलुंड तर तृतीय ‘पलाश’ दहिसर यांना देण्यात आला. तसेच ‘आरती’ सावंतवाडी आणि ‘रंगवाचा’ कणकवली यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक लोटणकर, वीरधवल परब व अजित राऊळ यांनी काम पाहिले. दिवाळी अंक स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र पवार, राजू बुरा, संदिप तानावडे, रविंद्र मोरे, प्रभाकर झगडे, नरु चितकेरी, जयश्री कदम, हेमा जैन, दत्ता कदम यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu