►जैतिर देवाचा वार्षिक उत्सव ३० मे पासून

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थाननराचा नारायण म्हणून सुपरिचीत असलेले तुळव गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव दि.३० मे पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात दुकानेही थाटून ११ दिवस चालणा-या या उत्सावासाठी दुकानदारांनी आपली जागा निश्चित केली आहे.

     अत्यंत जागृत असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी मुंबईठाणेकोल्हापूररत्नागिरीबेळगावसिंधुदुर्ग व नजिकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवावर मंदीचे सावट होते. मात्र अलिकडेच कोरोना संसर्ग संपुष्टात आल्याचे चित्र असल्याने पूर्वीप्रमाणेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार असल्याने देवस्थान समिती एवढ्यापासूनच नियोजनाच्या कामात व्यस्त आहे. सलग ११ दिवस चालणा-या या उत्सवाची सर्वानाच उत्कंठा लागून राहिली आहे.

Leave a Reply

Close Menu