►वै.मामा दांडेकर दिडीचे ३० जून रोजी प्रस्थान

प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी बेळगांव येथून वै.मामा दडेकर दिडी या पायी वारीचे प्रस्थान होणार आहे. दिडीचे हे ५३वे वर्ष असून ३० जूनला या दिडीला प्रारंभ होणार असल्याची माहिती ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी दिली आहे. या दिडीची सुरुवात प्रामुख्याने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तनाच्या सेवेने होतेहे या दिडीचे वैशिष्ट्य आहे.

      वेंगुर्ला येथील वै.दिगंबरपंत परुळेकर यांनी आषाढी एकादशीसाठी  बेळगांव येथून वैष्णव गुरुवर्य मामा दांडेकर दिडी सेवेची सुरुवात केली आणि ३६ वर्षे त्यांनी या दिडीचे नेतृत्व केले होते. सध्या ही दिडी वेंगुर्ला येथील संतसाहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे प्रस्थान करीत आहे. या दिडीत बेळगांवगोव व सिधुदुर्गातील सुमारे २०० भाविक यात सहभागी होत असतात. यावर्षी ही दिडी ३० जून रोजी बेळगांव येथून प्रस्थान करणार आहे. तत्पूर्वी २९ जून रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. ३० जून रोजी दिडीचा मुक्काम फलटण येथे असून १ ते ७ जुलै या कालावधीत फलटण ते वाखरी अशी दिडी चालणार आहे. ज्यांना या दिडीमध्ये सहभागी व्हायचे आहे किवा दिडीस सहकार्य करावयाचे आहे त्यांनी डॉ.भास्कर परुळेकर (९४४९१३९४४९) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu