►पहिल्याच पावसात झाडांची पडझड

मान्सूनने वेंगुर्ला तालुक्यातही जोरदार हजेरी लावली असून शुक्रवार पासून शनिवारी सायंकाळ पर्यंत पावसाची संतातधार सुरूच होती. दरम्यान शुक्रवारी पडलेल्या पावसात तालुक्यात काही प्रमाणात झाडांची पडझड होऊन नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.

      शुक्रवारपासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी व पेरणीसाठी सध्या मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान शुक्रवारी वेंगुर्ले किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान दाभोसवाडा सुरेश वामन बटवलकर व येथीलच सिप्रियन फर्नांडिस यांच्या घरावर शेजारील भेंडीचे झाड पडून घरांच्या छप्परांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या २४ तासात वेंगुर्ल तालुक्यात ९२.२ मिमी तर एकूण १११ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Close Menu