योजनांमधील त्रुटी दूर करण्याचे केंद्रीय मंत्र्यांकडून आश्वासन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संफ साधून त्यांची मते जाणून घेतली. केंद्रीय मंत्र्यांना थेट समस्या व सूचना सांगण्याची पहिलीच संधी वेंगुर्ल्यामध्ये मिळाल्याने लाभार्थ्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. लाभार्थ्यांनी योजनांमुळे झालेले फायदेअसलेल्या काही त्रुटी मंत्री नाईक यांना सांगितल्या. त्यांनीही सदर त्रुटी दूर करू लाभार्थ्यांना अधिक लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले.

      छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झालेल्या या चर्चात्मक कार्यक्रमाला विविध योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरपतहसीलदार प्रविण लोकरेमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेभाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

      पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ३० मे २०२२ रोजी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाचा कालावधी धरुन ८ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीतील मोदी सरकारची कामगीरी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री तसेच खासदार यांना आपला मतदारसंघ सोडून दुस-या राज्यातील एक लोकसभा मतदार संघात जाऊन कार्यक्रम घेण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. या आवाहनाला साथ देत केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी आज वेंगुर्ला येथील लाभार्थ्यांची संवाद साधला. मोदी सरकार सुरुवातीपासून गरिबांना न्याय देण्यासाठी विविध योजना राबवित आहे. घरकुल योजनाउज्वला गॅस योजनामोफत अन्नधान्य योजनाजनधन योजना यासह अनेक योजना आहेतयाबाबत माहिती दिली. नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांनी मंत्री नाईक यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu