बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे कर्मचारी माडकर व करंगळे सेवानिवृत्त

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी चंद्रशेखर माडकर हे आपल्या ३४ वर्षांच्या तर महादेव करंगळे हे २६ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त झालेल्या निरोपसमारंभावेळी महाविद्यालयाच्यावतीने माडकर व करंगळे यांचा सपत्निक  शालश्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

      चंद्रशेखर माडकर व महादेव करंगळे यांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल व केलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी विशेष कौतुक केले. तर प्रा.एस.टी.भेंडवडेव्ही.पी.नंदगिरीकरप्रा.डी.आर.आरोलकरप्रा.ए.पी.बांदेकरप्रा.विरेंद्र देसाईप्रा.डी.जे.शितोळेसुरेंद्र चव्हाणसंजय पाटील व सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अशोक सावळे यांनी  माडकर व करंगळे यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच सुमन करंगळे-सावंत व माडकर यांच्या भगिनी ज्योती माडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

      शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेने सेवा करण्याची संधी दिली याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळासहप्राचार्यडॉ.कै.एम.आर.देसाईमाजी आमदार कै.दिलीप देसाईविद्यमान सचिव जयकुमार देसाईपेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाईप्रशासन अधिकारी मंजिरी मोरे-देसाईसर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे माडकर व करंगळे यांनी आभार मानले.

      या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकशिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संजय पाटील यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तर प्रा.डॉ. आनंद बांदेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu