कोणीही कुठे गेले तरी वेंगुर्ल्यातील शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी

कोणी कुठेही गेले तरी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारीशिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहतीलअसा निर्णय वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

      यावेळी बोलताना यशवंत परब म्हणाले की२० जून रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर दुस-या दिवशी पहाटेपासून शिवसेनेला हेलावणारी घटना समोर आली. एकनाथ शिंदे व अन्य आमदारांचा गट गुजरातमध्ये गेल्याची बातमी झळकली. बहुसंख्य आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर येत असताना या मतदारसंघाचे आमदार असलेले दिपक केसरकर हेही त्या गटात सामील झाल्याची बातमी गुरुवारी सोशल माध्यमांवर येत आहे. परंतु कोणी – कुठेही गेले तरी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहणार,असा एकमुखी निर्णय झाला आहे. यावेळी पदाधिकारी यांच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या.

      यावेळी शहरप्रमुख अजित राऊळउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेसचिन देसाईउपतालुकाप्रमुख उमेश नाईकयुवासेनाचे पंकज शिरसाट, दाभोली सरपंच उदय गोवेकरवायंगणी सरपंच सुमन कामतसंदिप केळजीदयानंद खर्डेसंजय गावडेआनंद दाभोलकरशैलेश परुळेकरअण्णा वराडकरगजानन गोलतकरवेदांग पेडणेकरसुयोग चेंदवणकरराणेकौशल मुळीकबटा आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu