►एस.टी.वाहतूक बाजारपेठेतून सुरु

वेंगुर्ला आगारातून मठमार्गे जाणा-या सर्व बसेस वेंगुर्ला नगरपरिषदेने बाजारपेठ मार्गे जाण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहारामुळे 29 जूनपासून पासून वेंगुर्ला जूना एस.टी. स्टँण्ड, दाभोलीनाका, बाजारपेठ, मारूतीस्टॉप मार्गे तर मठ मार्गे वेंगुल्र्यात येणा-या सर्व एस.टी. गाड¬ा हॉस्पिटल कॅम्प, कॅम्प, पॉवर हाऊस, रामे·ार मंदिर मार्गे वेंगुर्ला आगारात येतील. एस.टी.च्या सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक शेवाळे यांनी केले आहे.
वेंगुर्ला नगरपरीषदेच्या बाजारपेठेत येणा-या सर्व नागरीकांनी गाडीअड्डा तिठा ते सारस्वत बँक हा “नो पार्किंग’ झोन असून या मुख्य बाजारपेठ रस्त्यावर कोणीही दुचाकी, तिन चाकी, चारचाकी यासह अन्य वाहने उभी (पार्किंग) करू नयेत. “नो पार्किंग’ एरीयांत वाहने उभी (पार्किंग) केल्यास दंडात्मक कारवाई करण्यांत येईल असे जाहीर केले आहे.
नगरपरीषद मार्केट लगतच्या एस.टी. बस जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी, चारचाकी ही वाहने उभी (पार्किंग) करू नयेत. नगरपरीषदेच्या सागररत्न मच्छिमार्केटच्या तळमजल्यावर वाहनांना नगरपरीषदेतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यांत आलेली आहे. त्याचा लाभ नागरीक, व्यापारी व वाहनधारकांनी घेऊन नरपरीषदेस व वेंगुर्ला आगारास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu