►वेंगुर्ला ते कालवीबंदर पायी वारी

विठ्ठल भक्तांच्या सहकार्याने १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ला दाभोली नाका येथून वेंगुर्ला ते कालवीबंदर अशी १८ किलोमिटरची पायी आषाढीवारी निघणार असून या जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

     सन २०२० मध्ये म्हणजे कोरोनाकाळात पंढरपूर वारीस बंदी आली होती. विठूरायाच्या दर्शनाची आणि वारीची आस भक्तांना स्वस्थ बसू देईनात. वैकुंठवासी श्रीकृष्ण उर्फ बाबू झांटये यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र येत वेंगुर्ला ते प्रतिपंढरपूर कालवीबंदर विठ्ठल मंदिरापर्यंत पायीवारी सुरु केली. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कालवीबंदर ग्रामस्थ व विठ्ठलभक्तांनी वारीचे उत्साहात स्वागत करुन त्यांच्या भजन व किर्तनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याहीवर्षी ही वारी जाणार असून १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ला-दाभोली नाका येथून या वारीला सुरुवात होईल. या वारीचे नियोजन करणे सोईचे होण्यासाठी वारीत सहभागी होऊ इच्छिणा-यांनी ९४२३३०१३१० किवा ७२७६८८७७७२ यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

Leave a Reply

Close Menu