►श्री रामेश्वराचा भजनी सप्ताह १४ पासून

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह १४ ते २१ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. दि.१४ जुलै रोजी स.९ वा. पारंपरिक पद्धतीने सप्ताहाची सुरुवात, दररोज अष्टोप्रहर भजने, सायं.६ ते १० या वेळेत निमंत्रित संगीत व वारकरी भजने, रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने, दि.२० रोजी रात्रौ १२ वा. दिडी, दि. २१ रोजी स.१० वा.रामेश्वर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२ वा. काल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर गावाच्या कल्याणासाठी गा-हाणे घालण्यात येणार आहे. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे. 

    सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून श्रावण महिन्यात होणा-या वरदशंकर व्रतपूजेची नावनोंदणी रोख २५०रु.भरुन केली जाणार आहे, याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.

                               

Leave a Reply

Close Menu