►स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रम

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  ९ ते १७ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      यानिमित्त दि.९ रोजी बॅ.खर्डेकर महाविद्यालयात सकाळी ११ वा. सामुहिक राष्ट्रगीतत्यानंतर ११.१५ वा.बॅ.खर्डेकर महाविद्यालयदाभोली नाकाजुना स्टँडशिरोडा नाकापावर हाऊस ते कॅम्प स्टेडिअमपर्यंत मोटर सायकल रॅलीदि.१० रोजी सकाळी ८ वा. डच वखारीची स्वच्छता मोहिमदि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. दाभोली नाका ते निमुसगा परिसरात स्वच्छता मोहिमसायं. ४ वा. नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात महिला बचत गटांसाठी आर्थिक साक्षरता आणि मोबाईलचे दुष्पपरिणाम यावर मार्गदर्शन शिबिरदि.१३ रोजी सकाळी ८ वा. वेंगुर्ला हायस्कूलहॉस्पिटल नाकाबाजारपेठदाभोली नाकाजुना स्टॅडशिरोडापावर हाऊस ते वेंगुर्ला हायस्कूलपर्यंत सायकल रॅलीसायं.४ वा. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे शेतक-यांसाठी सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन शिबिरदि.१४ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ पर्यंत फ्रिडम रन (सोल्जरेथॉन)सकाळी ८ वा. वृक्षारोपणरात्रौ १०.३० वा. नगरपरिषद कार्यालयदाभोली नाकाशिरोडा नाकालकी स्टोअर्स ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत मशाल फेरीदि. १५ रोजी सकाळी ८.३० वा. वेंगुर्ला हायस्कूलहॉस्पिटल नाकाबाजारपेठदाभोली नाकाशिरोडा नाकालकी स्टोअर्सपावर हाऊसस्टेडियम ते वेंगुर्ला हायस्कूलपर्यंत प्रभात फेरीदि.१६ रोजी दु. ३ ते ६ पर्यंत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात शालेय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमदि.१७ रोजी दु. ३ ते ६ पर्यंत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात देशभक्तीपर चित्रपट (उरी) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      या सर्व कार्यक्रमांमध्ये तसेच १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा‘ अर्थात हर घर तिरंगा‘ या अभियानात वेंगुर्ल्यातील सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu