वेतोरे हायस्कूल प्राचार्य स्वाती वालावलकर सेवानिवृत्त

          प्रत्येक मुलाची गती, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. पालकांनी आपल्या मुलांच्या आवडी-निवडी ओळखाव्यात. पालकांनी आपले मत पाल्यावर लादू नका. माझ्या प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी गुणी आहेत. त्यांनी केलेल्या नेत्रदीपक सदिच्छा सोहळ्याने मी भारावून गेले. मला प्रशालेतील शिक्षक, संस्था चालकांचे चांगले प्रेम मिळाले, त्यामुळे मी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविले. असे प्रतिपादन वेतोरे हायस्कूलच्या सेवानिवृत्ती शिक्षिका सौ. स्वाती रवींद्र वालावलकर यांनी केले.

      वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, कै. सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वालावलकर मॅडम यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रम वेतोरे हायस्कूलच्या स्वामी समर्थ सभागृहात नुकताच झाला. यावेळी शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे उपाध्यक्ष नंदकिशोर पुनाळेकर, कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, द्वारकानाथ बावडेकर, हरेश प्रभूतेंडोलकर, चंद्रकांत गडेकर, शिवराम गोगटे, स्मिता दामले, सूर्याजी नाईक, मधुसुदन गावडे, स्मिता शेणई, शेखर गावडे, माजी मुख्याध्यापक नंदकुमार ओगले, प्रज्ञा पायनाईक, वालावलकर मॅडमांचे पती रवींद्र वालावलकर, मुलगी मृण्मयी वालावलकर, मुलगा मयुर वालावलकर, भाऊ मोतिराम प्रभू, सहाय्यक शिक्षक संजय परब, कैलास खरबडे, दीप्ती प्रभू तुकाराम भोगण, ओवी पवार, सुजाता नाईक, पांडुरंग वगरे, तानाजी चव्हाण, प्रवीणा पालव, प्रशांत सावंत, रविकांत कदम, नीलेश पेडणेकर तसेच ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अजित मेस्त्री, चैतन्य सुकी, ओंकार गिरप, रोशन गवाणकर, किर्ती तेली, दीपाली मयेकर, निता मराठे, शांती सरनाईक, सुवर्णा टेंबकर, शिक्षकेतर कर्मचारी सौ. शिल्पा जोशी, मोहन वराडकर, मंगेश गोसावी, मारुती राऊळ, देवानंद चव्हाण, शिक्षक संतोष पवार, सुनील जाधव, भावना मांजरेकर, लाडोबा धर्णे, आत्माराम बागलकर, 2001 च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी, प्रकाश गावडे, उमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

      सौ. वालावलकर म्हणाल्या, ज्यावेळी आपल्याला एखादी संधी मिळते, त्यावेळी तिचे सोने करा. दुसऱ्यांना प्रेम द्या. दुसऱ्यांकडून प्रेम घ्या. मी संस्था चालकांकडून मिळवलं. मी दुसऱ्यांकडून प्रेम मिळवले. हा मी माझा सन्मान समजते. माझ्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी गुणी आहेत. त्यांनी केलेल्या नेत्रदीपक सदिच्छा कार्यक्रमाने मी भारावून गेले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनाही भावना दाटून आल्या होत्या.

      उपाध्यक्ष पुनाळेकर म्हणाले, वालवलकर मॅडमांची धुरा सांभाळून प्रशालेची प्रगती उत्तरेत्तर वाढवत न्यावी. प्रभाकर नाईक म्हणाले, शाळेतला विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला यात मॅडमांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षक आणि आई केव्हाही निवृत्त होत नाही. मॅडमांनी केव्हाही शाळेत यावे आणि अध्यापन करावे. एम. के. गावडे म्हणाले, मॅडमच्या ज्ञानाचा भविष्यात संस्थेला लाभ होण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी वालावलकर मॅडम यांचा संस्था व शाळेतर्फे सन्मानपत्र, रत्नजडित अंगठी, शाल, ओटी, नोटांचा हार घालून आगळावेगळा सत्कार करण्यात आला. गायत्री नाईक, यशोदा खानोलकर, शंकर धुरी, विजया पावसकर, यश नाईक, हर्षाली गावडे, प्रणव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अमर राऊळ, श्रेयस सडवेलकर यांनी काढलेल्या वालावलकर मॅडम यांच्या रांगोळीचे मान्यवरांनी कौतुक केले. सूत्रसंचालन नीलेश पेडणेकर यांनी तर आभार दिप्ती प्रभू यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu