अनुजा तेंडोलकर यांच्या पुस्तकाचे वस्त्रहरणकार गवाणकर यांच्या हस्ते प्रकाशन

      अनुजा तेंडोलकर यांना पॉवर लिफ्टींगमध्ये आतापर्यंत जेवढे पुरस्कार व मानसन्मान मिळाले त्याहीपेक्षा जास्त मानसनन्मान हे पुस्तक मिळवून देईल असा आशावाद ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त करुन हे पुस्तक विविध भाषामध्ये भाषांतरित करण्यात यावे असे प्रतिपादन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गृहिणी, इंटरनॅशनल पॉवर लिफ्टर, संगीत विशारद, चित्रकार ते महिला उद्योजक अनुजा तेंडोलकर यांच्या ‘पोलादी एक अष्टपैलू व्यक्तीमत्व’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर अध्यक्षिय भाषणाच्या वेळी बोलत होते.

      यावेळी व्यासपीठावर यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रकार अरुण दाभोलकर, दशावतारावर पहिला प्रबंध लिहिणारे प्रा.अशोक भाईडकर, श्री सातेरी व्यायाम शाळेचे किशोर सोनसुरकर, संगीत शिक्षक राजन माडये, व्यायामपटू प्रविण गुरव, डिंपल पब्लीकेशनचे अशोक मुळे, उद्योजक दतात्रय देशमुख,इंटर नॅशनल पॉवर लिफ्टर अनुजा तेंडोलकर आदी उपस्थित होते. कोरोना काळात अनुजा तेंडोलकर यांनी साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन साई मंगल येथे मांडण्यात आले होते. या कलादालनाचे उद्घाटन अरुण दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. लॉकडाऊन काळातील वेळेचे तेंडोलकर मॅडम यांनी संधीचे सोने केले. त्यांनी रेखाटलेली हि चित्रे आर्ट गॅलरीमध्ये ठेवण्याच्या योग्यतेची आहेत असे यावेळी अरुण दाभोलकर म्हणाले. तेंडोलकर यांच्या पोलादी या पुस्तकाचे प्रकाशन गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील 50 जणांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डिंपल पब्लीकेशनचे अशोक मुळे यांनी आपण गेल्या 48 वर्षात 700 ते 800 पुस्तके प्रकाशित केली. पण पोलादी हे सर्वोतम पुस्तक आहे. यातून इतरही स्त्रीयांसोबत पुररुषांनीही प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले. अशोक भाईडकर यांनी तेेंडोलकर बार्ईंचा थक्क करणारा हा प्रवास खरा आहे. म्हणूनच काही जणांना ततो पचनी पडणंही अवघड आहे. त्यांचे लिखाण वादळी असले तरी अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. आपण जे भोगले, जे अनुभव घेतले ते प्रामाणिकपणे मांडले. त्यामुळे काहिजणांची मने दुखावली जातील पण हे सत्य आहे. असे सांगून आपला जीवन प्रवास अनुजा तेंडोलकर यांनी विषद केला. यावेळी किशोर सोनसुरकर, राजन माडये, तरुण भारतचे आवृती प्रमुख शेखर सामंत, प्रविण गुरव, ॲड. सुहास सावंत, यांनी मनोगत व्यक्त केले. इशस्तवन भूषण तुळसकर, विजय तुळसकर यांनी तर निवेदन व आभार वैभव खानोलकर यांनी मानले. कार्यक्रमास जयप्रकाश चमणकर, वृंदा कांबळी, रेखा गायकवाड, ॲड. देवदत परुळेकर, मंगल परुळेकर, इर्शाद शेख, गुरु साटम, प्रसाद पानेरकर, निलांगी रागणेकर, दिनकर वरसकर, बाळू खांबकर, अभि वेंगुर्लेकर, उमेश येरम, सचिन परुळकर, भाई पडवळ, वृषाली केरकर, अमेय तेंडोलकर, पूनम तेंडोलकर, जे. वाय. नाईक, वर्षा वैद्य, प्रतिभा पाटणकर, केदार देसाई, माधवी मडकईकर, सर्व पत्रकार तसेच जिल्ह्यातून अनेक हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu