द रियल अॅवॉर्डसाठी सर्पमित्र दुतोंडकर यांची निवड

वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आडेली गावचे दीपक दुतोंडकर यांची प्राणीमित्र व सर्पमित्र द रियल अॅवॉर्ड २०२२निवड झाली आहे. २३ सप्टेंबर रोजी नदेड-हिगोली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  सर्पमित्र म्हणून तहानभुक विसरुन रात्री अपरात्री आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थी सेवा पुरवणा-या महाराष्ट्रातील १५ हजार सर्पमित्र-मैत्रिणींना गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे सिधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण ४० सर्पमित्रांपैकी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ८ सर्पमित्रांची निवड झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावच्या दीपक दुतोंडकर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Close Menu