पांडुरंग दळवी यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार

शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील २० शिक्षकांना देण्यात येणारा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला. यामध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयालातील शिक्षक पांडुरंग विष्णू दळवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

      पांडुरंग दळवी यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा खानोली-नाईकवाडी शाळेमध्ये हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविला होता. त्या उपक्रमाचा प्रस्ताव या नवोपक्रम उपक्रमांतर्गत शिक्षक ध्येयकडे सादर करण्यात आला होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची निवड करुन पांडुरंग दळवी यांना हा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल दळवी यांचे सर्वस्तठ्ठरातून अभिनंदन होत आहे. 

Leave a Reply

Close Menu