प्रसंगावधानामुळे शाळकरी मुलाचा वाचला जीव

परबवाडा-गवंडेवाडा येथे भाड्याने राहत असलेला व पहिलीत शिकणारा मुलगा आंबेखण पाण्यात बुडत होता. त्यावेळी परबवाडा-मासुरा वाडीतील हरिश्चंद्र राघोबा साटेलकर हे त्या मार्गाने कुडाळ येथे जात असतानाच मुलगा बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी पाण्यात उतरुन त्या मुलाचा जीव वाचवला.  साटेलकर यांच्या प्रसंगवधानाची गावाने दखल घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच पपू परब, उपसरपंच हेमंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संजय माळगांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, सामाजिक कार्यकर्ते मनवेल फर्नांडीस, विश्वास पवार, समिर चिदरकर, सायमन आल्मेडा, अजित गवंडे, डॉ.बाळू गवंडे, अनिल गवंडे, किशोर गवंडे, शशी गवंडे, दुवाट फर्नांडीस, एरोन फर्नांडीस आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu