शमशुद्दीन आत्तार यांना ‘मायक्रोसॉक्ट‘चा पुरस्कार

देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक शमशुद्दीन नसिरुद्दीन आत्तार यांना मायक्रोसॉफ्टच्यावतीने २०२२-२३ या वर्षासाठी एम.आ.ई.एक्स्पर्टहा पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. दरवर्षी मायक्रोसॉफ्टएज्युकेशनतर्फे जगभरातील शिक्षकांसाठी निर्माण केलेल्या व्यासपिठावर शाळेत किवा विद्यार्थ्यांवर राबविलेल्या वेगवेगळ्या कल्पना, उपक्रम, प्रकल्प मांडले जातात. त्यातील पथदर्शक उपक्रम मायक्रोसॉफ्टनिवडले जातात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आत्तार यांनी विद्यार्थ्यांना गणित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोपे करुन अध्यापन करणे हा प्रोजेक्ट सादर केला होता. या उपक्रमांतर्गत त्यांनी गणितातील दीड हजारांपेक्षा जास्त गुणधर्म सिद्धांत डिजिटल स्वरुपात तयार केले होते.

      भारतातून निवडलेल्या ९५ प्रकल्पात आत्तार यांच्या उपक्रमाची निवड झाली आहे. या निवडीमुळे जगभरात वेगवेगळ्या शिक्षणावर सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती व अभ्यास करण्याची संधी आत्तार यांना प्राप्त झाली आहे. या संधीचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नक्की होईल, असा विश्वास आत्तार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Close Menu